मौनाचं कुलूप कथासंग्रहाला पुरस्कार


डॉ राजेंद्र माने यांच्या साहित्यकृतीचा गौरव
सातारा
श्री कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी ता.वाळवा जि. सांगली यांच्या वतीने देण्यात येणारा २०२४ चा राज्यस्तरीय मातृस्मृती साहित्य पुरस्कार सातारचे कथा-कादंबरीकार राजेंद्र माने यांना जाहीर झाला आहे त्यांच्या मौनाचे कुलूप या कथासंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे . संस्थेच्या वतीने सर्व साहित्य पुरस्कार लवकरच मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वितरीत करण्यात येणार आहेत. रोख रक्कम, सन्मान पत्र, स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कारविजेते व साहित्यकृती
१) कादंबरी- अशोक पवार – चंद्रपूर- गावखोरी
२) कथासंग्रह- डॉ राजेंद्र माने -सातारा- मौनाचं कुलूप
३) कवितासंग्रह – किरण भावसार- नाशिक- घामाचे संदर्भ
४) ललित गद्य – प्रा. डॉ. विनय बापट- गोवा- माती आणि माणसं
५) चरित्र- प्रा. संध्या देशपांडे- बेळगांव – ब्रह्मांडनायक
६) बालसाहित्य – डॉ. स्मिता पाटील मोहोळ – मातीला पंख फुटताना – (कथाकार रावजी संताजी शिंदे स्मृती साहित्य पुरस्कार)
७) संकीर्ण – शाहीर शाहिद खेरटकर – चिपळूण – ललकारी (शीघ्र कवी तमाशा सम्राट नायकू जाधव स्मृती साहित्य पुरस्कार)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!