चिपळूणमध्ये रस्त्यावर मगर
मुंबई
पावसाळ्यात लोक पाण्याचा आनंद घेण्यासाठी नदी किनारी, तर कधी धबधबा, तळ्याजवळ जातात. पावसाळ्यात बहुतांश वेळा पाण्याची पातळी वाढल्यामुळे मगर पाण्याबाहेर येतात. ज्यामुळे माणसांसाठी ही गोष्ट धोकादायक असू शकते. सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक फोटो किंवा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असणार, असाच एक व्हिडीओ चिपळूणमधून समोर आला आहे. या व्हिडीओत एक मगर मानवी वस्तीत फिरताना दिसत आहे.
चिपळूण मधील चींचनका परिसरात महाकाय मगर रस्त्यावर आढळून आली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मगर रहदारिच्या रस्त्यावर चालताना दिसत आहे. मगरीला असं पाहून कोणाच्या ही हृदयाचा ठोका चुकेल. ही घटना कारमधील एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे
