कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा:राज ठाकरे
मुंबई
कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि मी एकत्र आलो आहे. आम्हाला एकत्र आणायचं बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, कुणालाच जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं,असे मनसेप्रमुख राज ठाकरेंनी म्हटले आहे
मुंबई येथे झालेल्या विजय मेळाव्यात ते बोलत होते
राज ठाकरे म्हणाले,आजचा मेळाव्याला कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पाहायचं नाही, तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे. आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे, एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येतं त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणून. पण तुम्हाला कुठे येते? आम्ही मराठी भाषा कधी लादली का?, हिंदी फक्त 200 वर्षे पूर्वीची आहे,
आमची मुले इंग्रजीत शिकली. माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले. मग त्यांच्या मराठीवर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न घेणार का? उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठी भाषेचा कडवट अभिमान बाळगेल तुम्हाला काय प्रॉब्लम आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते? कोणती भाषा? संरक्षण दलात विविध रेजिमेंट आहे. एखादी घटना घडली की सगळे तुटून पडतात ना. आज सगळे तुम्ही मराठी म्हणून एकत्र आला आहेत. त्यामुळे आता पुढे जातीपातीचं राजकारण सुरु होईल. आता सुरू केलंय यांनी मीरा भाईंदरला व्यापाराच्या कानफाडात मारली. व्यापाऱ्याला मारलं म्हणतात, पण अजून तर काहीच केलेलं नाही. विनाकारण मारामारी करत नाहीत. मात्र जास्त उठबस केली तर कानाखाली आवाज काढला जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
नयन शाह नावाचा माझा मित्र आहे. मी त्याला गुजराठी म्हणतो. अतिशय उत्तम मराठी बोलतो. शिवाजी पार्कत फिरताना पु.ल. देशपांडे ऐकतो, असं राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेब यांच्यासोबतची एक घटना आहे, ती मी विसरू शकत नाही. मी एके दिवशी दुपारी मातोश्रीला बसलो होतो. त्यावेळी प्रकाश जावडेकर आले. बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आले. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असा निरोप घेऊन आले. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे. मला त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का?, मराठीसाठीची एकजूट कायम राहणं गरजेचे आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले

