कोयना धरणातून 41000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग


नवजा येथे 4000 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद.
पाटण दि.प्रतिनिधी.
कोयना पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे.मात्र पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे.धरणात सध्या प्रति सेकंद 3800 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान,कोयना धरणातून पायथा वीजगृह व धरणाच्या वक्र दरवाजातून 32,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.मात्र कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता तसेच धरणात येणाऱ्या पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी आज पुन्हा कोयना धरणातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.
कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे त्रिपुडी चोपडी बेलवडे मुळगाव या गावांसाठी महत्त्वपूर्ण असणारा मूळगाव पूल पाण्याखाली गेला आहे.कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असला तरी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे दमदार पडलेल्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रातील ओढे नाले प्रवाहित झाले आहेत त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही वाढत आहे धरणात सध्या 38 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणाचा पाणीसाठा 85.44 टीएमसी वर पोहोचला आहे.पाणलोट क्षेत्रातील नवजा या ठिकाणी यावर्षी पावसाने 4000 मिलिमीटर चा टप्पा ओलांडला आहे आत्तापर्यंत कोयना 3600 नवजा 4182 तर महाबळेश्वर येथे 3937 मिलिमीटर पावसाची नोंद आज पर्यंत झाली आहे.कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना कोयना धरण व्यवस्थापनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!