बीबीए,बीसीएसाठी पुन्हा सीईटी


शिवाजी विद्यापीठात झालेल्या बैठकीत निर्णय

सातारा
प्रतिनिधी

Advertisement

बी.बी.ए.आणि बी.सी.ए. या व्यावसायिक शिक्षण पदवीसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्यासाठी उच्च, तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात झालेल्या बैठकीत सूचना दिल्या आहेत. प्रवेश पूर्ण होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २५-२६ साठी पुन्हा सीईटी घेण्याची सूचना उच्च शिक्षण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या शैक्षणिक वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बीबीए बीसीए साठीची प्रवेश परीक्षा न दिल्यामुळे सदर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. आता पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्याना प्रवेश घेणे सोयीचे होणार आहे.
बीसीए बीबीए अभ्यासक्रमासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे संलग्नीकरण शुल्क व अनामत रक्कम कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल व त्यासाठी चेअरमन यांची संस्था चालकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे मंत्री महोदयांनी जाहीर केले.
या बैठकीसाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उपाध्यक्ष प्रताप माने, प्राचार्य डी.आर. मोरे, ॲड. धैर्यशील पाटील, प्राचार्य व्ही.एम. पाटील, उच्च शिक्षण सचिव वेणुगोपाल रेड्डी, संचालक शैलेंद्र देवळणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव उपस्थित होते.
सदर सीईटी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो व शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र होतो. बीबीए आणि बीसीए प्रवेशासाठी पुर्नपरिक्षेसाठी अर्ज करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र शासनाने शेवटची संधी म्हणून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश परिक्षा ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सोय रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवेश कक्षात करण्यात आली असल्याचे संचालक डॉ.बी.एस. सावंत यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!