पंजाब किंग्ज आयपीएल फायनलमध्ये
मंगळवारी विजेतेपदासाठी बेंगळुरूशी भिडणार
अहमदाबाद
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सने पराभव केला आणि आयपीएल 2025च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.मंगळवारी विजेतेपदासाठी बेंगळुरूशी त्यांचा अंतिम सामना होणार आहे प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात 203 धावा केल्या, प्रत्युत्तरात पंजाबने श्रेयसच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या मदतीने 19 षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात 207 धावा करून विजय मिळवला. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला ज्यामुळे सामना दोन तास 15 मिनिटे उशिराने सुरू झाला.
तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या शानदार खेळीच्या मदतीने मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत सहा गडी गमावून 203 धावा केल्या पण हे लक्ष्य पंजाबने सहज पार केले
हा सामना संपल्यावर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, पावसानंतर आम्ही मैदानात आलो, पण त्यानंतरही आम्ही दमदार फलंदाजी केली. माझ्यामते दोनशे धावा या सामन्यासाठी पुरेश्या होत्या. कारण या सामन्यात जास्त दडपण असते आणि एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नसते. पण त्याचवेळी श्रेयस अय्यर मुंबईच्या विजयाच्या मार्गात आला. श्रेयस अय्यरने अप्रतिम फलंदाजी केली. श्रेयसने या सामन्यात जोखीम पत्करली आणि त्याचा त्याला फायदा मिळाला. श्रेयस या सामन्यात मोठे फटके मारायला विसरला नाही आणि त्याच्यामुळेच आमचा पराभव झाला. “