“अष्टगंधार”मध्ये एस पी बालसुब्रम्हण्यम यांची गाणी
आवाजाच्या जादूगाराची गाणी ऐकून रसिक मंत्रमुग्ध
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग आठवा दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित केला गेला. हा कार्यक्रम आवाजाचे जादूगार अशी ओळख असणाऱ्या एस पी बालसुब्रम्हण्यम यांच्या गाण्यांवर आधारित होता.
रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे श्री. प्रमोद लोंढे यांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शशिकांत पवार, श्री यशेंद्र क्षीरसागर, श्री. , श्री. सुनील साबळे, सौ. सुरेखा शेजवळ, राजेंद्र शेजवळ,मुकुंद फडके तसेच दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इवेंट्स चे श्री. प्रमोद लोंढे यांची होती व निवेदन सौ राधिका काळे यांचे होते. श्री. प्रमोद लोंढे यांचे सोबत रॉयल चे इतर गायक यांनी त्यांना साथ संगत केली. सर्व प्रमुख पाहुण्यांनी आणि रसिक श्रोत्यांनी श्री. प्रमोद लोंढे आणि इतर गायक कलाकारांचे भरभरून कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी डॉक्टर शशिकांत पवार म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या हॉलमध्ये भरपूर कराओकेचे कार्यक्रम होत असतात.एस पी बालसुब्रमण्यम हे मुख्यतः साउथ इंडियन गायक.बालसुब्रमण्यम हे कन्नड तमिळ तेलगू भाषेतील गायक असून त्यांचे करोना काळात निधन झाले ही दुःखद घटना संगीत क्षेत्रात होती.
शिरीष चिटणीस म्हणाले,श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रह्मण्यम ज्यांना सामान्यतः एसपीबी किंवा बालु म्हणून ओळखले जाते.ते एक भारतीय पार्श्वगायक , टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता, अभिनेता, संगीतकार, डबिंग कलाकार आणि चित्रपट निर्माता होते. त्यांना सर्व काळातील महान भारतीय गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू , तमिळ , कन्नड , मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आणि एकूण १६ भाषांमध्ये ते गायले.
यशेंद्र क्षीरसागर म्हणाले, संगीतात मोठी ताकद असते.रॉयल इव्हेंट्सचा अष्टगंधार कार्यक्रम स्पृहणीय आहे.भविष्यातही असे कार्यक्रम व्हायला हवेत.
मुकुंद फडके म्हणाले,रॉयल इव्हेंट्स ग्रुपने नवीन सिझनची तयारी करावी.भारतीय संगीत म्हणजे गुणवत्तेची खाण आहे.या खाणीतील हिरे वेचून जुन्या आणि नव्या काळातील गायकांची गाणी सादर करून ग्रुपने रसिकांना संगीताची मेजवानी द्यावी