टीम इंडिया गुरूवारी भारतात येणार


मोदींबरोबर चहापान,मुंबईत मिरवणूक

मुंबई
टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया उद्या म्हणजेच गुरूवारी भारतात येणार आहे. भारतीय संघाचे खेळाडू गुरूवारी दिल्लीमध्ये उतरतील, यानंतर टीम दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटेल. पंतप्रधानांसोबत भारतीय खेळाडू नाश्ता करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर खेळाडू दिल्लीहून मुंबईकडे रवाना होतील.
मुंबईमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरूवारी संध्याकाळी 4 वाजता या मिरवणुकीला सुरूवात होईल. या विजयी मिरवणुकीत भारतीय खेळाडू ओपन बसमधून प्रवास करतील. नरिमन पॉईंटच्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टपासून या मिरवणुकीला सुरूवात होईल. वानखेडे स्टेडियमपर्यंत खेळाडू ओपन बसने प्रवास करतील. यानंतर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीमला हे बक्षीस जाहीर केलं होतं.
सकाळी 6 वाजता- दिल्ली विमानतळावर आगमन
सकाळी 6.45 मिनिटांनी- आयटीसी मौर्यामध्ये चेक इन
सकाळी 9 वाजता- हॉटेलमधून पंतप्रधान कार्यालयाकडे निघणार
सकाळी 10 ते दुपारी 12- पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कार्यक्रम
दुपारी 12 वाजता- पंतप्रधान कार्यालयातून पुन्हा आयटीसी मौर्याकडे प्रस्थान
दुपारी 12.30 वाजता- आयटीसी मौर्यावरून दिल्ली विमानतळाकडे प्रस्थान
दुपारी 2 वाजता- दिल्लीहून विमानाने मुंबईकडे रवाना
दुपारी 4 वाजता- मुंबई विमानतळावर आगमन
संध्याकाळी 5 वाजता- वानखेडे स्टेडियमवर आगमन
संध्याकाळी 5 ते 7 – विजयी मिरवणूक
संध्याकाळी 7 ते 7.30- वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रम
संध्याकाळी 7.30 वाजता- हॉटेल ताजकडे रवाना

Advertisement

या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 रनने पराभव केला. या विजयासोबतच भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळही संपला. याआधी भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रुपात जिंकली होती. तर शेवटचा टी-20 वर्ल्ड कप 17 वर्षांपूर्वी जिंकला होता.
याआधी 2007 साली भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळीही मुंबईतून ओपन बसने मिरवणूक काढण्यात आली होती. धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!