मंगळवारी गाणी मराठी मनातली कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफर ग्रुपची प्रस्तुती
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा, व सुहाना सफर ग्रुप सातारा यांच्यातर्फे “गाणी मराठी मनातली” भाग १ ही मराठी गीतांची बहारदार मैफिल दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे मंगळवार दिनांक १० जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजता होत आहे.या कार्यक्रमासाठी डॉ शशीकांत पवार,डॉ जीवन लाहोटी,अविनाश कदम,संजय शिंदे,प्राचार्य वि ना लांडगे,विजय साबळे आणि शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.तरी या संगीत मैफिलीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.
यावेळी डॉसुहास पाटील, सचिन शेरकर, अल्ताफ मुल्ला, मिलिंद हर्षे, गणेश शिंदे, मंजुषा पोतनीस, सुषमा बगाडे, ममता नरहरी, स्मिता शेरकर, मंजिरी दीक्षित, कला चंद, इंद्रायणी कुलकर्णी, गीतांजली जगदाळे गाणी सादर करणार आहेत
या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन विजय साबळे यांचे असून निवेदन ऋतुजा देवी करणार आहेत
ध्वनी व्यवस्था सचिन व अक्षता शेवडे सांभाळणार आहेत

