नवीन पॅनकार्ड येतंय
क्यूआर कोडसह होणार अधिक सुरक्षित
नवी दिल्ली
सध्या भारतीयांकडे असलेलं पॅनकार्ड लवकरच जुनं होणार आहे, आणि त्या पॅनकार्डची जागा पॅनकार्ड 2.O घेणार आहे.पॅन 2.O या प्रकल्पाला कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स कडून मंजुरी मिळाली आहे.ज्यांच्याकडे जुनं पॅनकार्ड आहे त्यांना काहीही बदलण्याची गरज नाही. यासाठीची प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करावी लागणार आहे .
हे पॅन कार्ड ‘कॉमन बिझनेस आयडेंटिफायर’ म्हणूनही विकसित केलं जाईल, म्हणजेच हे पॅनकार्ड वेगवेगळ्या व्यवसायांसाठी ओळख क्रमांक म्हणूनही वापरू शकता येईल
अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकानुसार, सध्याचं पॅनकार्ड हे पॅन 2.0 आल्यावरही वैध राहील. जुन्या पॅन धारकांना नवीन कार्डसाठी अनिवार्यपणे अर्ज करण्याची आवश्यकता नाही मात्र ते त्यांचं पॅन विनामूल्य अपग्रेड करू शकतील.पॅन नंबर आणि बाकी सगळे तपशील हे जुन्या पॅनवर आहेत तेच राहतील. क्यूआर असलेलं पॅन हे नागरिकांना विनामूल्य मिळेल आणि ई-पॅन नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल.
प्रत्यक्ष प्लास्टिकच्या पॅनकार्डसाठी, अर्जदाराला 50 रुपये भरावे लागतील.
पॅन 2.0 मधील क्यूआर कोडमुळे पॅनकार्ड अधिक सिक्युअर राहील. आणि कुणाला बनावट पॅनकार्ड तयार करता येणार नाही. याशिवाय पॅनकार्ड व्हेरिफिकेशन करणंही सोपं जाईल.क्यूआर कोड स्कॅन करून माहितीची थेट पडताळणी करता येणं शक्य झाल्यानं मोबाईल ॲप किंवा पोर्टलद्वारे ती स्कॅन करून लगेच माहिती मिळवू शकणार आहात.क्यूआर कोडमध्ये नाव, जन्मतारीख, पॅन क्रमांक आणि इतर तपशील एनक्रिप्टेड स्वरूपात असतील, ज्यामुळे ते अधिक सुरक्षित होईल.