आर्ट फ्युजन फेस्टीव्हल १२ मे पासून


विविध कला कार्यक्रमांची रसिकांना मेजवानी

सातारा
सातारकर रसिकांना दरवर्षी प्रतीक्षा असलेला आर्ट फ्युजन फेस्टीव्हल 2025 यावर्षी १२ मे ते १७ मे या काळात शाहू कला मंदिर येथे रंगणार आहे या काळात रसिकांना नाट्य,चित्र,संगीत ,शिल्प ,नृत्य आणि साहित्य या सर्व कलांवर आधारित कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे
12 मे रोजी नाट्य चौफुलामध्ये दुपारी 1.30 वाजता 1)दगड आणि माती 2) हंडाभर चांदण्या 3)कलगीतुरा 4) तो राजहंस एक. हे मराठी रंगभूमीवरील लँडमार्क
सलग चार दीर्घांक सादर केले जाणार आहेत
13 मे रोजी झाडांच्या मनात जाऊ ही थोर मराठी हिंदी कवींच्या झाडांच्या कवितांची मैफल सायंकाळी 7 वाजता होणार आहे
14 मे रोजी 1)नवस 2)साठी 3) कूकर या तीन एकांकिका सादर होणार आहेत
15 मे रोजी स्टाच्यू फॅक्टरी हे दोनअंकी नाटक होणार आहे
16 मे रोजी सायंकाळी 5 वाजता 1) पार्टी 2) एकडोके चार पाय ही दोन बालनाट्य सादर होतील
17 मे रोजी श्वेतवर्णी श्यामकर्णी हे महाभारतकालीन नाटक सायंकाळी 7 वाजता होणार आहे

Advertisement

12 मे रोजी शिल्पकला प्रात्यक्षिके 3 वाजता,13 मे रोजी खुली काव्यवाचन स्पर्धा दुपारी 3 वाजता,14 मे रोजी राज्य स्तरीय पोर्ट्रेट स्पर्धा,
15 मे रोजी राज्य स्तरीय लॅण्डस्केप स्पर्धा,16 मे बाळगोपालांची सकाळी 10 वाजता चित्रकला स्पर्धा,साभिनय वेशभूषा स्पर्धा, रंगभूषा वेशभूषा प्रात्यक्षिके,
17 मे रोजी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दुपारी 1 वाजता होणार आहे
हे सर्व कार्यक्रम शाहू कलामंदिर सातारा येथे होणार असून देणगी सिझन तिकीट केवळ 200 रुपये आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!