छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन कौशल्य


छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन कौशल्य

छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था आणि कार्यपद्धती अतिशय प्रभावशाली होती.आधुनिक काळात एक आदर्श मॅनेजमेंट गुरु म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव केला जातो तो उगीच नाही राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य समन्वय साधून  महाराजांनी कृतीशील व्यवस्थापन स्वराज्यामध्ये लागू केल होत.

महाराजांची  व्यवस्थापन तत्वे पुढीलप्रमाणे होती

१. सरकारी नोकर हे फक्त त्यांच्या योग्यतेवर निवडले जात होते, आणि नोकरीमध्ये कुठेही वंश परंपरेला महत्व दिले गेले नाही.धर्म आणि जाती हे मुद्दे कोणत्याही सरकारी नोकरीसाठी विचारात घेतले जात न्हवते. व्यक्तीचे कौशल्य आणि योग्यता या गोष्टींच्या आधारावर व्यक्तीची निवड होत असे.

२. सर्व सरकारी नोकरांना पगार हा पैशांच्या स्वरुपात दिला जात होता. जमीन किंवा जहागीर या स्वरुपात कोणालाही मोबदला दिला जात नसे.

३. सर्व व्यवस्थापनेचे काम विविध खात्यांमध्ये विभागले गेले होते आणि प्रत्येक खात्याचे काम आणि जबाबदारी अतिशय विचारपूर्वक आखली गेली होती.

४. महसूल हा सरकारी महसूल विभागाकडून वसूल केला जात असे आणि त्यावर महाराजांचे नियमित लक्ष असे. महसूल हा थेट महसूल विभागाकडे जमा होत असे आणि त्यामध्ये कोणत्याही मध्यस्थीला सहभाग मिळत नसे.

 

महाराजांनी कोणालाही जमीन अथवा जहागीर दिली नाही. एवढेच नाही तर मंत्र्यांना देखील त्याचं पद मरेपर्यंत सांभाळता येईल याची शाश्वती न्हवती.

Advertisement

कोणत्याही मंत्र्याला पदापासून दूर करणे अथवा त्याच्याकडे दुसरे खाते देणे या गोष्टी योग्यतेनुसार ठरत असत.मंत्रिमंडळ हि संकल्पना महाराजांनी स्वराज्यामध्ये सुरु केली आणि त्यानुसार स्वराज्याचे कामकाज हे ८ विविध विभागांमध्ये वाटले गेले.

अष्टप्रधान मंत्रिमंडळातील खाती खालील प्रमाणे होती

१. पेशवा(पंतप्रधान) – prime minister

२. अमात्य (महसूल मंत्री) – revenue minister

३. सचिव (अर्थ मंत्री) – finance minister

४. मंत्री (अंतर्गत कामकाज मंत्री) – minister for interior

५. सेनापती (सैन्य प्रमुख ) – commander in chief

६. सुमंत (परराज्य धोरण मंत्री ) – minister for external affairs

७. न्यायाधीश (कायदा आणि सुव्यवस्था) – chief judge

८. पंडित (धार्मिक व्यवस्था मंत्री) – minister for religious affairs

पेशवा याचं काम इतर सर्व खात्यांवर देखरेख करणे  हे होते .यामधील पंडित आणि न्यायाधीश वगळता इतर सर्व मंत्र्यांना त्यांना दिलेल्या खात्याच्या जबाबदारी शिवाय सैन्याचा एक भाग म्हणून काम करावे  लागत असे. महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील ५ खात्याच्या मंत्र्यांना सैनिकी काम दिले होते. सेनापतीला मात्र राजनैतिक प्रशासनामध्ये हस्तक्षेप करू दिला जात नसे. एकूणच महाराजांनी अतिशय कार्यक्षम प्रशासन व्यवस्था लागू केली होती. त्याची कार्य पद्धती समाजाला फायदेशीर अशीच होती. न्याय, प्रशासन, करमणूक आणि इतर सर्व गोष्टी ज्या एक समाज घडवण्यासाठी आणि बांधण्यासाठी गरजेच्या आहेत त्या सर्व महाराजांनी स्वराज्यामध्ये घडवून आणल्या. शिस्तबद्ध प्रशासन घडवले . आजच्या राजकारण्यांना आणि समाजकारण्यांना स्वराज्याच्या प्रशासन व्यवस्थेमधून शिकण्याची गरज आहे कि राज्य कस चालवाव आणि सुधारणा कशा घडवाव्यात.

आज समाजाला या व्यवस्थापनपूर्ण कौशल्यावर आधारित  शिवशाहीची गरज आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!