मातेनेच पोटच्या पोरांना संपवले


पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील घटना
पुणे
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले आणि नवऱ्यावरही कोयत्याने वार केले पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
आज (8 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिढे या 30 वर्षीय महिलेला ताब्यात घेतलं आहे. शंभू दुर्योधन मीढे (वय 1 वर्ष) आणि पियू दुर्योधन मीढे (वय 3 वर्ष) अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मीढे (वय 35 वर्ष) याच्यावरही कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!