पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन


तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र
मुंबई
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला
गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचे हायकोर्टाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला
16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे त्यांच्य राहत्या घरी अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी देखील याचा संबंध होता. मात्र, महाराष्ट्रातील तपास यंत्रणांना या हत्येचा तपास सुरु असताना यश आलेलं नव्हतं. जेव्हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली होती. गोविंद पानसरे यांच्या प्रकरणाचा सीआयडी कडून सुरु होता. मात्र, हा खटला अजूनही सुरु आहे. आरोपींना 2018 साली अटक करण्यात आली होती. आरोपी 6 ते 7 वर्षे झाले अटकेत आहेत. त्यामुळे त्यांनी जामीनास अर्ज केला होता. हा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही आणि तपास यंत्रणेला या खटल्यात यश देखील आलेलं नाही. त्यामुळे हायकोर्टाला जामीन मंजूर केला

Advertisement

याबाबत मेघा पानसरे म्हणाल्या, न्यायालयाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधारे दिलेला आहे. आम्ही जजमेंट पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जायचं का याबाबत आमच्या वकिलांशी चर्चा करु. प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. तपास यंत्रणांना याबाबत अपयश आलं आहे. हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. हा खटला प्रदीर्घ काळ चाललेला आहे. सहा वर्ष झाले..या काळात तपास यंत्रणा सुद्धा आम्ही बदलून घेतली आहे. नियमित सुनावणी घेऊन हा घटला संपवावा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!