माय मराठी महोत्सवात शुक्रवारी कुलूप चित्रपट


‘अनुभव फिल्म क्लब’ द्वारे आयोजन

सातारा
सातारकर चित्रपट रसिकांसाठी सुंदर चित्रपटांची मेजवानी ‘अनुभव फिल्म क्लब’ द्वारे करण्यात आली आहे.या माय मराठी महोत्सवात शुक्रवारी एका मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा असलेला सुंदर चित्रपट ‘कुलूप’ दाखवण्यात येणार आहे

Advertisement

या वेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘डॉ. रुद्र करपे’उपस्थित राहणार असून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे
सातारकर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
मनोरंजनातून समाज प्रबोधन चित्रपट माध्यमाद्वारे २७ वर्षे सातत्याने करणारी चित्रपट रसिकांची कलात्मक चळवळअनुभव फिल्म क्लब’तर्फे हा ‘माय मराठी महोत्सव’ रविवार २६ जानेवारी २०२५ पर्यंत ‘सेवन स्टार चित्रपटगृह, सातारा’ येथे दररोज सकाळी ९.३० वा. आयोजित करण्यात आला आहे.
वर्षभर जागतिक दर्जाचे उत्तमोत्तम विदेशी चित्रपट दाखवतानाच मराठी चित्रपट सृष्टीतील काही नजरेतून सुटलेले वेगळेपण जपणारे चित्रपटांना रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच दिग्दर्शक कलावंतांचा रसिकांशी भेट घडवून आणण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!