भाजपने अहंकारात राहू नये :शरद पोंक्षे


नागपुरातील व्याख्यानमालेमध्ये भाजपला घरचा आहेर

नागपूर

भाजपची  काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्व बाळगणाऱ्या दहा भाजप उभा करू शकतो हे लक्षात ठेवावं, असा सूचक इशारा मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी नागपुरातील  एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आता आम्हीच आहोत, या अहंकारात भाजपनं राहू नये, असं वक्तव्यही शरद पोंक्षे  यांनी या कार्यक्रमात बोलताना केले

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं रविवारी नागपुरात व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी  शरद पोंक्षे उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘भारत एक हिंदू राष्ट्र’ या विषयावर बोलताना शरद पोंक्षे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे, मात्र भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर, अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा सूचक इशारा शरद पोंक्षे यांनी बोलताना दिलाय.

Advertisement

“आज भारतामध्ये हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातायत. ‘गवनि म्हणा आम्ही हिंदू आहोत’, असं म्हणण्याची ताकद केवळ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळेच आहे. याचं संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जातं. शंभर वर्षात अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आई आहे. मात्र, भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. पुन्हा दहा-पंधरा वर्ष वाट पाहावी लागली तरी चालेल. पण, कट्टर हिंदूच्या दहा भाजप उभ्या करण्याची ताकद संघात आहे…”, असे शरद पोंक्षे म्हणाले

नागपुरात रेशीमबाग इथल्या महर्षी व्यास सभागृहात व्याख्यानमालेचा कार्यक्रम पार पडला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!