वार्षिक राशिभविष्य 2025: मीन
वार्षिक राशिभविष्य 2025
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते
मीन
वर्षाची सुरुवात संमिश्र
मीन राशीच्या व्यक्तींना 2025 या वर्षाची सुरुवात संमिश्र परिणाम करणारी असेल कारण मीन राशीला साडेसाती सुरू आहे नोकरदार व्यवसायिकांना कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल व्यापार करणाऱ्या व्यक्तींनी एखाद्या नव्या व्यवसायात गुंतवणूक करताना सगळ्या बाबींचा विचार करून मगच गुंतवणूक करावी काहींना वर्षाच्या सुरुवातीलाच करिअरमध्ये नवीन संधी मिळतील प्रभावशाली व्यक्तींचा सहवास मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल काहींना नोकरी मिळण्यासाठी आपल्या मित्रांचा उपयोग होईल प्रेम संबंधात थोडी नाराजी राहील परंतु योग्य संवाद साधून तुम्ही संबंध सुधारू शकता तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काही ना काही तक्रारी चालू राहतील त्यामुळे तुमच्यावर मानसिक ताण वाढेल योग व्यायाम आणि ध्यान केले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल 29 मार्च 2025 रोजी शनिदेव कुंभ राशीतून तुमच्या म्हणजे मीन राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे मानसिक त्रास वाढेल सावध रहा मात्र जास्त काळजी करू नका मानसिक आणि शारीरिक त्रास होणे आणि कुटुंबापासून मतभेद होऊन दूर जाणे हा साडेसातीमध्ये शनिदेव प्रभाव देतात तुमच्याच राशीमध्ये असणारा राहू आणि नंतर येणारा क्षणी हा तुमच्यासाठी सकारात्मक नाही परंतु जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होत राहिलात तर मानसिक त्रास कमी होईल 14 मे रोजी गुरु ग्रहाचे गोचर वृषभ राशीतून मिथुन राशीत होईल म्हणजेच तुमच्या राशीच्या चतुर्थस्थानातून तुमचा राशी स्वामी गुरु भ्रमण करेल गुरुचे हे भ्रमण तुमच्यासाठी फारसे शुभ नाही त्यामुळे सावध राहा कोणतेही चुकीचे अनैतिक काम करू नका न्याय प्रक्रिया मधले कोणतेही नियम मोडू नका आपल्याबरोबरच इतर सगळ्यांच्या बाबतीत चांगले विचार करा यावर्षी गुरु अतीचारी होऊन 18 ऑक्टोबर ते पाच डिसेंबर 2025 पर्यंत कर्क राशीत भ्रमण करणार आहे हा काळ तुमच्यासाठी जास्त शुभकारक असेल या काळात अनेक तरुण-तरुणींचे विवाह होतील कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील ज्या जोडप्यांना संततीची इच्छा असेल त्यांची इच्छा या काळात पूर्ण होईल तुम्ही केलेल्या अनेक गुंतवणुकीतून तुम्हाला धनलाभ होतील राहू आणि केतू 30 मे 2025 रोजी राशी परिवर्तन करणार आहेत राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीतून भ्रमण करील. त्यामुळे अनेकांना परदेशात नोकरी मिळण्याचे योग येतील शत्रूंवर विजय मिळवाल न्यायालयीन प्रक्रियेमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागेल आर्थिक स्थिती मजबूत होईल एखादे जुने येणे वसूल होईल मीन राशीसाठी मार्च मे ऑगस्ट आणि डिसेंबर हे महिने आव्हानात्मक राहतील