हनुमान जन्मोत्सवाला करा ‘हे’ उपाय!
शनिदोष आणि साडेसातीच्या त्रासातून मिळेल मुक्ती
सातारा
शनी देव आणि मारुतीरायाची मैत्री सर्वाना माहीत आहे.शनी देव म्हणजे संकट म्हणून न पाहता शनी देव म्हणजे संधी, स्वतःला सिद्ध करण्याची, हे मारुती रायने ओळखले आणि त्याच्या या सकारात्मक दृष्टिकोनावर प्रसन्न होऊन शनी देवाने त्याला आशीर्वाद दिला, की जो भक्त तुझी उपासना करेल त्याने मी सुद्धा संतुष्ट होईन. एवढेच नाही तर त्याच्यावरील संकटाचे निवारण देखील करेन. यासाठीच २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर मारुतीची विशेष आराधना करून शनिदोष आणि साडेसातीच्या त्रासातून मुक्ती मिळेल
नेहमीच्या शनिवारी हे उपाय करावेच, शिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानेही पुढील उपाय केले असता निश्चितच लाभ होईल.
– आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे
– स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य देणे
– हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थरामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणणे
– सुमिरी पवनसुत पावन नामू। अपने बस करि राखे रामू॥ हा मंत्र जप करणे. तसेच ॐ शं शनैश्चराय नम: नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् । या मंत्रांचा जपही उपयुक्त ठरू शकतो.
– हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
– पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान
अर्थात, शनीची चांगली वाईट फळे मिळणे हे प्रत्येकाच्या कुंडलीतीळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. शनी करतो, ते चांगल्यासाठी करतो, यावर विश्वास ठेवा.सर्वांत महत्त्वाचे साडेसातीला अजिबात घाबरू नका
