महिला प्रबोधन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
छोटा व्यवसाय सुरु करण्याबाबत सखोल मार्गदर्शन
सातारा
स्वावलंबी भारत अभियान, सातारातर्फे नटराज मंदिर, सातारा येथे आयोजित केलेल्या महिला प्रबोधन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
घरेलू कामगार, कचरा वेचक महिला, इतर छोटी मोठी कामे करून चरितार्थ चालवणाऱ्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
छोटा व्यवसाय कसा सुरु करावा,कोणता करावा,बचत गटांनी कसं काम करावं,कर्ज कसं मिळतं,बाजारपेठ कशी शोधायची, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका श्रीमती कांचनताई परुळेकर, त्यांच्या सहकारी सौ. सौम्या तिरोडकर, सौ. प्रिया आणि सौ. तेली उपस्थित होत्या.
प्रात्यक्षिकासह त्यांनी छोटे छोटे व्यवसाय कसे सहज करता येतील हे सांगितले.आपल्या ओघवत्या सहज शैलीत त्यांनी सर्व विषयांना स्पर्श केला. तसेच उद्योगाविषयी छोटी छोटी गाणी म्हणून महिलांना गुंतवून ठेवले.त्यानंतर कुटुंब प्रबोधन आयमाच्या सौ. स्वाती गानू यांनी कुटुंब व्यवस्था कशी मजबूत करायची,घरात संस्कार नसतील तर अर्थ कमवूनही त्याला काही अर्थ उरणार नाही, घरातील मुलांवर लक्ष ठेवून त्यांना चांगल्या वाईटाची जाणीव करून देणं गरजेचं आहे हे सोदाहरण समजावून सांगितले.
प्रबोधन मंच, साताराचे आशिष शहाणे यांनी शंभर टक्के मतदान करा आणि हिंदुत्वाला मतदान करा असे आवाहन केले.

छोटासा अल्पोपहार आणि चहापान झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वावलंबी भारत अभियानचे जिल्हा समन्वयक श्रीराज दीक्षित, सह समन्वयक ऍड श्री. योगेंद्र सातपुते, पालक आशिष शहाणे, पूर्ण कालीन सदस्य विशाल साळुंखे तसेच सौ. मधुताई कांबळे, सौ. सीताताई चव्हाण, सौ. वनिता पवार, सौ. उर्मिला पवार, सौ. उज्ज्वला निंबाळकर यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रम यशस्वी केल्याबाबद्दल स्वावलंबी भारत अभियान प. महाराष्ट्र महिला सह समन्वयक सौ. सायली मुतालिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत

