लोणावळ्यात अश्लील फिल्मचे शूटिंग
10 तरुण, 5 तरुणींचा सहभाग,13 जणांना अटक
पुणे
एका ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळ्यात अटक करण्यात आली आहे. लोणावळ्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यातील एका व्हीलावर हा प्रकार सुरू होता. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून तरुण आणि तरुणी एकत्र आले होते.अश्लील व्हिडीओ तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनि छापा टाकला आणि १३ जणांना अटक केली असून दोघे फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणींकडून लोणावळ्यात अश्लील व्हिडीओ तयार केले जात होते. देशात अश्लील व्हिडीओ तयार करणं कायद्यानं गुन्हा आहे. या व्हिडिओवर बंदी असतानाही असा प्रकार करत असल्याची माहिती समजली होती.
पोलिसांनी सांगितले की, १५ जणांमध्ये ५ तरुणींचा समावेश होता. सर्वजण वेगवेगळ्या राज्यामधील आहेत. व्हीलावर छापा टाकून १३ जणांना अटक केलीय. तसंच घटनास्थळी पोलिसांनी अश्लील व्हिडीओ शूट करण्यासाठी वापरलेले कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यात काही अश्लील व्हिडीओ फुटेजचासुद्धा समावेश आहे
