वाईत प्रथमच भरतनाट्यम् अरंगेत्रम्


कलावर्धिनी डान्स कंपनीतर्फे रविवारी कार्यक्रम
वाई

विख्यात शास्त्रीय भरतनाट्यम् गुरु नर्तिका डॉ. सुचेताताई चापेकर यांच्या आशिर्वादाने, त्यांच्या कन्या आणि शिष्या सौ. अरुंधती पटवर्धन यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात ‘कलावर्धिनी डान्स कंपनी, पुणे’ या शास्त्रीय भरतनाट्यम् नृत्य शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या वाई शाखेतर्फे वाईत प्रथमच अरुंधती पटवर्धन, भाग्यश्री देव आणि ऋचा खरे यांच्या सहा शिष्यांचा भरतनाट्यम् अरंगेत्रम् कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘सर्व देवाय नमः’ शीर्षकाचा हा कार्यक्रम रविवारी दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, वाई येथे सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. अवनी देशपांडे, राधा ढेकाणे, जान्हवी जगदाळे, वेदिका चिकणे, प्रणाली भुतकर, दिया बाचल या शिष्या आपली कला या कार्यक्रमात सादर करतील.

Advertisement


संस्थेच्या प्रणेत्या श्रीमती अरुंधती पटवर्धन आणि संस्कार भारती सातारा जिल्ह्याच्या नृत्यविधाप्रमुख सौ. नेहा भिडे-घाडगे या सन्माननिय प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य प्रकारात रस असणाऱ्या सर्व रसिकांनी निःशुल्क कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन या सर्व शिष्यांच्या पालकांतर्फे आणि संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!