पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू


बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण

Advertisement

पुणे
पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला .हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमला या घटनेची माहिती मिळाली. एका रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला.
पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास धुके असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते आणि तिघांचाही मृत्यू झाला. या परिसरात एकमेक हेलिपॅड असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती तिथे येत असतात. घटनेची माहिती पोलिसांसह, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.
ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल नावाच्या केंद्र सरकारच्या संस्थेच्या मधल्या डोंगराळ भागातील के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर काही अंतरावरच हेलिकॉप्टरचा अपघात झाला, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे तिन्ही मृतदेह गंभीररित्या जळाले.
महत्वाची बाब म्हणजे मुंबईतून सुतारवाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टर मधून प्रवास करणार होते मात्र त्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर कोसळलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!