मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित


समाजाला होत असलेल्या त्रासामुळे निर्णय

Advertisement

जालना
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत, असं जरांगे म्हणाले.
आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. तसंच, सर्व मराठा समाजाला विनंती आहे की आपण एक रहा. कोणत्याही विषयावर वाद घालू नका. आपल्याला एकत्र राहण्याची सध्या गरज आहे. सरकारने आमच्या मागण्या आता सोडवाव्यात असंही ते म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की आमचा वर्ग आपल्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्हाला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही जायचं नाही. त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण फायदा घ्या. उगीच आपलं नुकसान करु नका. मात्र, तुम्ही जर फक्त गणित लावत बसले तर ते तितकं सोप नाही मराठा समाज हा मोठा सहनशील समाज आहे. आपण त्याचा अंत पाहू नये


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!