45 टक्के डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतात चूक


द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली धक्कादायक माहिती

Advertisement

नवी दिल्ली
द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने डॉक्टर्सकडून दिल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शनबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.रुग्णांना प्रिस्क्रिप्शन देताना सुमारे 45 टक्के डॉक्टर्स एक चूक करत असल्याचं आयसीएमआरनं सांगितले आहे
द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर ही एक महत्त्वाची संस्था आहे. 2019 मध्ये आयसीएमआरकडून औषधांच्या तर्कशुद्ध वापराबाबत एक टास्कफोर्स स्थापन करण्यात आली. या टास्कफोर्सच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत 13 सरकारी रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये एक सर्वेक्षण केलं. दिल्लीतील एम्स, सफदरजंग, भोपाळ एम्स, बडोदा मेडिकल कॉलेज, मुंबई जीएसएमसी, ग्रेटर नोएडा मेडिकल कॉलेज, सीएमसी वेल्लोर, पीजीआय चंडीगड आणि पाटणा येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये हे सर्वेक्षण झालं. त्यात 7800 रुग्णांची प्रिस्क्रिप्शन्स अभ्यासासाठी घेण्यात आली.आपल्या ओपीडीमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर लिहून देतात ती प्रिस्क्रिप्शन्स अपूर्ण असतात. हा सरळसरळ रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. 13 सरकारी रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून आयसीएमआरने ही माहिती समोर आणली असून लवकरच केंद्र सरकार या विरोधात काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
4338 प्रिस्क्रिप्शन्स तपासली असता त्यापैकी 2171 प्रिस्क्रिप्शन्स अपूर्ण असल्याचं दिसून आलं. धक्कादायक गोष्ट अशी की त्यातील 475 म्हणजे सुमारे 9.8 टक्के प्रिस्क्रिप्शन्स ही पूर्ण चुकीची होती. बहुतेक रुग्णांना पॅंटोप्रॅझोल, रॅबेप्रॅझोल डोंपेरिडोन आणि एन्झाइम औषधं देण्यात आली. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि हाय ब्लड प्रेशर असेल्या रुग्णांची प्रिस्क्रिप्शन्स सर्वाधिक चुकलेली असल्याचंही दिसून आलं.डब्ल्यूएचओकडून 1985 मध्ये तर्कशुद्ध प्रिस्क्रिप्शन्स लिहिण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या, मात्र आजघडीला जगातील सुमारे 50 टक्के प्रिस्क्रिप्शन्स ही चुकीच्या पद्धतीने लिहिली जात असल्याचा अंदाज आहे. अनेक रुग्णांना त्यांना दिली जाणारी औषधं कोणत्या आजारासाठी आहेत, ती कशी आणि किती काळ घ्यायची हेच माहिती नसतं.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!