डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय पुरस्कार जाहीर


राजश्री शहा आणि अमोल अहेर या लेखकांचा गौरव
सातारा
सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी चालू वर्षात प्रसिद्ध झालेल्या दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण’
आणि ‘ सौ सुमन चव्हाण’ उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.ग्रंथालयाच्या अध्यक्ष सुनिता उत्तेकर, उपाध्यक्ष प्राचार्य प्रमोदिनी मंडपे आणि संचालक डॉ अनिमिष चव्हाण यांचे वतीने यावर्षीच्या ग्रंथ पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे
राजश्री शहा, सातारा (अनुवादक)यांना : व्हाईट टॉर्चर या पुस्तकासाठी “ग्रंथमित्र शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” आणि अमोल अहेर ‘शिव’,पुणे यांना अंतरीचा कॅनव्हास या पुस्तकासाठी “सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे
तसेच या प्रसंगी दोन उत्तेजनार्थ ग्रंथ पुरस्कार मोहन काळे, मुंबई यांना ‘एकदा आपणच मोर व्हावे’ या कविता संग्रहासाठी आणि सौ. भारती धनवे यांना ‘दर्शनमात्रे’ या पुस्तकांसाठी जाहीर झाले आहेत
याशिवाय ग्रंथालयाचे पुरस्कारासाठी या वर्षी पुस्तके पाठवलेल्या इतर अनेक लेखकांपैकी सातारा शहरातील शुभांगी दळवी ,संगिता केंजळे, मनिषा शिरटावले, अदिती काळमेख, आनंदा ननावरे या लेखकांना ‘प्रेरणा पुरस्कार’ देण्यात येणार आहेत
पुरस्कार वितरण समारंभ ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी,(पुणे) यांच्या हस्ते गुरूवार दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अश्वमेध अभ्यासिकेच्या ‘सोमण सभागृह राजवाडा चौक सातारा येथे होणार आहे .
महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीला ज्यांनी दिशा दिली होती तसेच सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे व ग्रंथालय चळवळीचे मार्गदर्शक, सातारा येथील ग्रंथमहोत्सवाचे प्रेरणास्थान व संस्थापक अध्यक्ष ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सुमन शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ
गेली पंधरा वर्षे हे पुरस्कार दिले जातात.महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लेखक यासाठी चालू वर्षामध्ये प्रकाशित झालेले आपले ग्रंथ पाठवतात.त्यापैकी
दोन उत्कृष्ट ग्रंथाना प्रत्येकी 2500/-रोख बक्षीस दिले जाते.
सातारमधील लेखक,कवी तसेच ग्रंथप्रेमी,वाचन प्रेमी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ग्रंथालयाच्या कोषाध्यक्ष सुनिता कदम आणि संचालक डॉ राजेंद्र माने यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!