संस्कार भारतीतर्फे गुरुवर्यांचा सन्मान


विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

सातारा
संस्कार भारती पश्चिम प्रांत सातारा जिल्हा समितीतर्फे गुरुवंदना कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुजनांचा आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला दीपलक्ष्मी पतसंस्था सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर रुपेश कुंभार,दिलीप चरेगावकर, संजय दीक्षित, प्रदीप इनामदार उपस्थित होते
या सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला
यावेळी साहित्य क्षेत्रातील ज्योत्स्ना कोल्हटकर, शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य यशवंत पाटणे,नृत्य क्षेत्रातील सुधांशु किरकिरे,शास्त्रीय संगीत क्षेत्रातील डॉ संगीता कोल्हापूरे आणि रामभाऊ पवार ,भावगीत सुगम गीत गायक अनिल वाळींबे,नाट्य क्षेत्रातील रघु आपटे आणि रेखा बंड, मूर्तिकला शिल्पकला क्षेत्रातील सौ दीपा कुंभार ,गणेश मूर्तीकार सूर्यकांत कुंभार,आदर्श विद्यार्थी स्वरूप कुंभार यांचा सन्मान शिरीष चिटणीस यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन करण्यात आला

Advertisement

 


यावेळी बोलताना शिरीष चिटणीस म्हणाले, मराठी भाषा वाढवण्यासाठी संस्कार भारतीचे मोठे काम आहे सांस्कृतिक सातारा पुन्हा प्रस्थापित व्हावा यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे कोणत्याही समाजात गुरूंचे महत्व असते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच समाज घडतो गेल्या काही काळात समाजात गुंडगिरी वाढत चालली असल्याने संस्काराचे महत्व अधोरेखित होते
यावेळी ज्योत्स्ना कोल्हटकर ,अनिल वाळिंबे, प्राचार्य यशवंत पाटणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.वयाच्या ९५ व्या वर्षीही गायक रामभाऊ पवार यांनी खणखणीत आवाजात भजन सादर करून वाहवा मिळवली
प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले,संस्काराला कृतीची जोड मिळाली की संस्कृती तयार होते आणि अशी संस्कृती जपण्याचे आणि जोपासण्याचे काम संस्कार भारती करते.समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून संस्कार भारतीने एक चांगला आदर्श घालून दिला आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश कुंभार यांनी केले
सुत्रसंचलन डॉ सुनील देशपांडे यांनी केले
पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!