जगभरातील बँकिंग आणि विमानसेवा ठप्प


मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड

Advertisement

वॉशिंग्टन
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. जगभरामध्ये विंडो सिस्टिमवर ब्ल्यू स्क्रिनचा एरर दिसत आहे. दरम्यान, कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बहुतांश विंडोड युझर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर दिसत आहे.
ही अडचण हल्लीच्या क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे. या अडचणीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत.दरम्यान, या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे. क्राऊड स्क्राइकने ही अडचण येत असल्याचे मान्य केले आहे. तसेच ते याचा तपास करत आहेत. क्राऊड स्क्राइकने याबाबत लिहिलं आहे की, विंडोज सिस्टिममध्ये दिसत असलेल्या एररबाबत आम्हाला माहिती आहे.बहुतांश युझर्स याबाबत तक्रार करत आहेत. या अडचणीमुळे लाखो युझर्सना फटका बसला आहे. अनेक युझर्स त्यांच्याकडे सिस्टिम शटडाऊन झाल्याची किंवा त्यांना ब्लू स्क्रीनची अडचण येत असल्याची तक्रार करत आहे. याचा फटका मुख्य बँका, इंटरनॅशनल एअरलाइन्स, जीमेल, अॅमेझॉन आणि इतर अत्यावश्यक सेवांना फटका बसला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!