जाधववाडी,सातारा येथे ‘वृक्षारोपण कार्यक्रम’
हिंदुस्तान फीड्स,युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल,श्रीराम फाऊंडेशन यांचा उपक्रम
सातारा
जाधववाडी, सातारा येथे ‘हिंदुस्तान फीड्स कंपनी,सातारा व युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल, सातारा श्रीराम फाऊंडेशन यांच्यामार्फत ‘वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते व निर्देशक सयाजी शिंदे,उप-वन संरक्षक अधिकारी अदिती भारद्वाज,वनाधिकारी श्री.अभिजीत माने,शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने,उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,हिंदुस्तान फीड्स कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी येणाऱ्या आषाढी एकादशीचे औचित्य साधत ‘दिंडी सोहळ्याचे’ व ‘पाणी हेच जीवन’ नाटिकेचे सादरीकरण केले.प्रमुख पाहुणे सयाजी शिंदे व वनाधिकारी अदिती भारद्वाज यांनी विद्यार्थ्यांशी पर्यावरण व झाडांचे महत्व या विषयावर संवाद साधत आपले मौलिक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.इयत्ता दहावीतील विद्यार्थी आयुष काळे याने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शनाचा कार्यभार सांभाळला.वृक्षांचे संगोपन ही काळाची गरज असल्याची मूल्ये रूजवत,श्रमदानाचे कर्तव्य बजावत या कार्यक्रमाची सांगता झाली.
