गौरीशंकर सनशाईन स्कूलमध्ये वारकरी दिंडी सोहळा


सातारा
शाश्वत सुखाचा खरा आनंद भक्तीमय सोहळ्यातून प्राप्त होतो असे मत डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी व्यक्त केले त्या गौरीशंकरच्या सनशाईन इग्लिश मीडियम स्कूल खटाव ने आयोजित केलेल्या आषाढी वारकरी दिंडी सोहळ्याच्या पालखी पूजन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, प्राचार्या प्रमिला टकले, आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रिया शिंदे पुढे म्हणाल्या की वारकरी परंपरेची शिकवण सामाजिक ऐक्य एकात्मतेला पूरक ठरणारी आहे.
यावेळी स्कूलचे विद्यार्थी विठुराया व रुक्माई च्या वेशभूषेत विठ्ठल नामाचा जयघोषात सामील झाले होते ढोल ताशा व लेझीम तालासुरात संपूर्ण खटाव मधून वारकरी दिंडी काढून संपूर्ण खटाव भक्तीमय केले ठीक ठिकाणी या वारकरी दिंडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
दिंडी सोहळ्यातील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी कौतुक केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!