राष्ट्रवादी काँग्रेस काश्मीरमध्ये निवडणूक लढवणार
मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव दौरा करणार
श्रीनगर
राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू- काश्मीरमध्ये निवडणूकपूर्व हालचाली सुरू केल्या आहेत .त्याच पार्श्वभूमीवर राज्य समितीने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा दौरा जाहीर केला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस जम्मू – काश्मीर विभागाच्या ८ दिवसाच्या या दौऱ्यात पक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय करणार असून पक्षाच्या योजना आणि जम्मू-काश्मीरच्या विकासाबाबत माहिती देणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष डॉ.तारिक रसूल यांनी दिली.
तळागाळातील कार्यकर्त्यांना सशक्त करणे हा पक्षाचा उद्देश आहे. यावेळी ब्रिजमोहन श्रीवास्तव वैयक्तिकरित्या जिल्हा अधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषत: बूथ प्रभारी यांच्याशी चर्चा करतील आणि या बैठकींमुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होईल, ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तळागाळातील योद्धे तयार होतील असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद संघटनेचा पाया मजबूत करतो, ज्यामुळे पक्षाची वाटचाल निवडणुकीत विजयाकडे होते, म्हणूनच पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे तारीक रसूल यांनी सांगितले.
ब्रिजमोहन श्रीवास्तव हे राष्ट्रीय प्रवक्ता असल्याने त्यांना प्रसारमाध्यमांचे महत्त्व कळते आणि पत्रकारितेचे सामर्थ्य त्यांना कळते, त्यामुळे ते स्थानिक पत्रकार, पत्रकार प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या भेटी घेणार आहेत.
ब्रिजमोहन श्रीवास्तव हे १२ जुलै रोजी श्रीनगरला पोहोचतील आणि १९ जुलै २०२४ रोजी परततील, या दरम्यान ते ८ जिल्हे आणि सुमारे ३७ मतदारसंघामधील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. ब्रिजमोहन श्रीवास्तव हे जम्मू – काश्मीरमध्ये पक्षाचे भविष्य मजबूत करतील असा विश्वासही तारिक रसूल यांनी व्यक्त केला.
आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल पटेल यांची जनतेच्या सेवेसाठी बांधिलकी आहे.आमचा राजकीय प्रवास हा पदांसाठी नसून आम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आहे. आमची कृती ही आमच्या शब्दांपेक्षा कामाकडे जास्त असली पाहिजे आणि आमचे समर्पण हे देशाला पुढे नेणारे दीपस्तंभ असले पाहिजे आणि म्हणूनच आमच्या नेत्यांच्या भावनेनुसार जम्मू- काश्मीरमधील आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना तयार करण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी माहिती ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.
