पावसाळी कवितांमध्ये रसिक चिंब
मसाप शाहूपुरी शाखेतर्फे पर्जन्यसूक्त कार्यक्रम
सातारा
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा यांच्या पुढाकाराने महाकवी कालिदास दिनानिमित्त चौघीजणी प्रस्तुत पर्जन्यसूक्त हा कार्यक्रम नगर वाचनालय पाठक हॉल येथे सादर करण्यात आला मराठी साहित्यातील जुन्या नव्या कवींच्या लेखणीतून उतरलेल्या पाऊस कविता, गप्पा आणि गाणी यांची सुरेल सफर असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते सातारकर रसिकांनी भर पावसात या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
डॉक्टर आदिती काळमेघ शुभांगी मदने आणि सविता कारंजकर यांनी या आगळ्या कार्यक्रमात अनेक कवींच्या पावसावरील कविता सादर करून रसिकांना चिंब केले
सविता कारंजकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलें यावेळी डॉक्टर आदिती काळमेघ शुभांगी मदने आणि सविता कारंजकर यांनी बालकवी,बा भ बोरकर ,सदानंद रेगे,अनिल या जुन्या जाणत्या कवींसह नलेश पाटील,अभिजित साळुंखे,लता चव्हाण अशा नवीन पिढीतील कवींच्या कविता सादर केल्या शुभांगी मदने यांची यावेळी श्रावणात घन निळा बरसला ,नाच रे मोरा,आला आला वारा अशी काही पाऊस गाणी सुरेल आवाजात गाऊन रसिकांची दाद मिळवली डॉक्टर आदिती काळमेघ शुभांगी मदने आणि सविता कारंजकर यांनी यावेळी आपल्या स्वतःच्या कविताही सादर केल्या कविता सादर होत असताण पडद्यावर संबंधित कवितेचे शब्द आणि त्याला अनुरूप चित्र पाहायला मिळाल्याने रसिकांना वेगळा अनुभव घेता आला
सातारकर रसिकांनी या कार्यक्रमाला भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले
