अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा


5 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
वॉशिंग्टन
अमेरिकेतील सनी व्हॅली येथे असलेल्या पुण्यातील प्रख्यात पीएनजी ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी चोरी केली आहे. जवळपास 20 दरोडेखोर मास्क घालून शोरूममध्ये घुसले, त्यानंतर तोडफोड करून सोन्या-चांदीचे दागिने लुटले.याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीची ही घटना 12 जून रोजी दिवसाढवळ्या घडली आहे. बे एरियामध्ये गेल्या सहा आठवड्यात भारतीय ज्वेलर्स लुटण्याची ही तिसरी घटना आहे. (robbery in famous
महाराष्ट्रात पीएनजी ज्वेलर्सचे प्रख्यात नाव आहे. भारतीयांच्या मालकीचे असलेल्या पीएनजी ज्वेलर्सचे शोरूम अमेरिकेतील एल कॅमिनो रिअल कॉम्प्लेक्समध्ये आहे. 12 जून रोजी, 20 हून अधिक दरोडेखोरांनी दुपारी 1.30 च्या सुमारास शोरूमवर हल्ला केला, तोडफोड केली आणि दागिने लुटले. त्यानंतर सर्व आरोपी कारमधून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ दाखल झाले.तोपर्यंत दरोडेखोरांनी अनेक वाहनांमधून पळ काढला होता.यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सूचना दिल्याने सॅन फ्रान्सिस्को किनारपट्टीच्या दिशेने जाणाऱ्या दोन संशयित गाड्यांचा पाठलाग केला. या दोन्ही गाड्या अत्यंत वेगाने असल्याने त्या काही वेळातच दिसेनाशा झाल्या. मात्र पोलिसांच्या सहयोगी यंत्रणांनी रेडवुड सिटीजवळ एका गाडीचा शोध लावला. यावेळी पाच दरोडेखोरांना पोलिसांनी शिताफीने पकडले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!