अंबादास दानवेंची भर सभागृहात शिवीगाळ
भाजप आमदार प्रसाद लाडांना वापरली अर्वाच्च भाषा
मुंबई
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या एका विधानवरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच चांगलंच रण पेटलं. हा वाद एवढा पेटला की, विधानपऱिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भर् सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.ज्यानंतर विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ झाला.
राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी विधानपरिषदेत भाजपच्या वतीने करण्यात आली होती. ज्यानंतर याच मुद्द्यावर बोलताना अंबादास दानवे हे बोलण्यासाठी उभे राहिल्यावर प्रसाद लाड यांनी त्यांच्या दिशेने काही हातवारे केले. ज्यानंतर दानवेंचा पारा हा चांगलाच चढला आणि त्यांनी थेट अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव विधानपरिषदेत करण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. ज्यावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उभे राहिले.
दानवे म्हणालेसभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे की, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं.. हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये…”ये तू हात नाही करायचा.. माझ्याकडे हात नाही करायचा.. तिकडे करायचा.. तिकडे करायचा.. तिकडे करायचा..
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर सभागृह तहकूब करण्यात आलं. पण त्यानंतर प्रसाद लाड हे अत्यंत संतप्त झालेले दिसून आले. विऱोधी पक्षनेते दानवेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणीच त्यांनी यावेळी केली. तसंच राजीनामा होणार नाही तोवर सभागृह चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दुसरीकडे अंबादास दानवे यांनी देखील सभागृहातून बाहेर येताच पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले की…
‘माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. त्यामुळे माझा कोणताही तोल सुटलेला नाही. जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता.. सभापतींना बोललं पाहिजे.. माझ्याकडे बोट दाखवून, हातवारे करून समोरच्या सदस्याला बोलायचा अधिकार नाही.’
‘माझ्यावर ७५ केसेस आहेत. सगळ्या दंगलीच्या केसेस आहेत, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहेत. ४-४ वेळेस तडीपार झालेला शिवसैनिक आहे मी. मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा बाटगा.. नुस्ता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन.. तो मला हिंदुत्व शिकवणार का?’मला भाषण करायचं होतं सभागृहात.. त्यामुळे मी माझे मुद्दे याचा अभ्यास करत होतो. परंतु भाजप वेगवेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्ष नेता म्हणून मला त्यावर बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून मी एवढाच प्रश्न सभापतींना केला की, हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का?’
