बीबीए,बीसीए अतिरिक्त सामूहिक प्रवेश परीक्षा
ऑनलाईन फॉर्म भरणेची प्रक्रिया सुरू, ३ जुलैपर्यंत मुदत
सातारा
बीबीए व बीसीए प्रवेशासाठी शासनाची अतिरिक्त सामूहिक प्रवेश परीक्षा फाॅर्म ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक २९ जून ते ३ जुलै २०२४ या कालावधीत फॉर्म भरणे आवश्यक आहे
ज्या विद्यार्थ्यांनी सदर सीईटी प्रवेश परीक्षा ऑनलाईन फाॅर्म भरलेला नाही परंतु त्यांना बीसीए बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी इन्स्टिट्यूटच्या प्रवेश कक्षामध्ये येऊन फॉर्म भरावा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी.एस.सावंत यांनी केले आहे.
यूजीसी आणि एआयसीटीई यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २४- २५ पासून बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाला व्यवसायिक पदवी दर्जा मिळाल्यामुळे इंजिनिअरींग पदवी प्रवेशाप्रमाणे बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत पहिल्यादांच बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा घेतली गेली. अनेक विद्यार्थ्यांनी सदरची प्रवेश परीक्षा दिली नसल्याने प्रवेशापासून वंचित राहिले होते. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अतिरिक्त सामूहिक प्रवेश परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली असून सदर प्रवेश परीक्षाचे फाॅर्म ऑनलाईन प्रक्रिया दिनांक २९ जून ते ३ जुलै २०२४ या कालावधीत भरणे आवश्यक आहे.
