डीवायएसपीचा झाला थेट शिपाई


हॉटेल रुममध्ये महिला पोलिसासोबत सापडल्याने कारवाई

लखनौ

Advertisement

कृपाशंकर कन्नौजिया हे काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील बीघापुरमध्ये डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलिसच्या (डीवायएसपी) पदावर तैनात होते.
पण त्यांनी एक मोठी चूक केल्याने त्यांचे थेट डिमोशन झालं. डीवायएसपी राहिलेले कृपाशंकर आता पोलीस कॉन्स्टेबलच्या पदावर नोकरी करताना दिसतील.
कृपाशंकर बीघापुर सर्कलच्या डीवायएसपी पदावर तैनात होते. एक दिवस ते वेळेवर घरी पोहोचले नाहीत. त्यावरुन पत्नीने उन्नावच्य एसपीकडे तक्रार केली. एसपीने कृपाशंकर यांचा फोन सर्विलांसला लावला. त्यामुळे त्यांचं लोकेशन समजलं. कानपुरच्या एका हॉटेलच लोकेशन होतं. त्यानंतर एक पोलीस टीम बनवण्यात आली. तात्काळ पोलीस टीम कानपूरला रवाना करण्यात आली. तिथे एका हॉटेलच्या रुममध्ये कृपाशंकर कन्नौजिया महिला कॉन्स्टेबल सोबत होते.
कृपाशंकर कन्नौजिया यांनी आपल्या नोकरीची सुरुवात पोलीस कॉन्स्टेबल पदापासून केली होती. 1986 साली त्यांची शिपाई पदावर तैनाती झाली. त्यानंतर त्यांनी विभागीय परिक्षा दिली. ती पास करुन ते शिपाईवरुन दरोगा बनले. काही दिवस या पदावर काम केलं. त्यांना नंतर प्रमोशन मिळालं. इंस्पेक्टरच पद त्यांना मिळालं. काही काळ इंस्पेक्टर म्हणून काम केल्यानंतर सीओच्या रँकवर प्रमोट केलं. पण एका चुकीमुळे त्यांना गोरखपूर पीएसी येथे पाठवण्यात आलं. ते अजून शिपाई म्हणून तो जॉईंन झालेले नाहीत.
कृपाशंकर मूळचे देवरियाचे आहेत. ते वेळेवर घरी आले नाहीत, म्हणून पत्नीने एसपीकडे तक्रार केली. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर डीजीपीने त्यांना निलंबित केलं. पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणार काम करताना ते आढळले. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!