सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतणे झाले अवघड
एअरक्राफ्टच्या खराबीमुळे अडचण
वॉशिंग्टन
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात झेप घेतली. यानंतर त्यांनी आपल्या आनंदाचा क्षण सर्वांसोबत शेअर केला होता. जगभरातून त्यांचे कौतुक केले गेले.दरम्यान सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? हा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे. अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणाऱ्या बोइंग स्टारलाइनरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अतराळवीरांच्या पहिल्या गटाला घेऊन जाणाऱ्या स्टारलाइनरचे परतणे पुढे ढकलण्यात आले आहे. एअरक्राफ्टच्या खराबीमुळे ही अडचण येत आहे. सुनीता विल्यम्ससह या टीममधील सदस्य कधी परतणार याची नवी तारीख नासाने अद्याप दिलेली नाही.
अंतराळयानाचे परतीचे नियोजन यापूर्वी २६ जून रोजी होणार होते. याआधी तीनदा रिटर्न पुढे ढकलण्यात आले आहे. नासाला हे मिशन अत्यंत काळजीपूर्वक, सावधगिरीने पूर्णत्वास न्यायचे आहे. यात त्यांना छोटीशीही चूक करायची नाहीय. 6 तासांच्या उड्डाणात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. नासा कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. विशेष म्हणजे या मिशनचे प्रक्षेपणही याआधी दोनदा पुढे ढकलण्यात आले आहे. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात 322 दिवस वास्तव्य केले आहे. अशा परिस्थितीत जगभरातील लोकांच्या हृदयाचे ठोके आता वाढू लागले आहेत.
अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांनी ५ जून रोजी उड्डाण केले. ज्या अंतराळयानातून सुनीता त्यांच्या साथीदारांसह अवकाश मोहिमेवर गेल्यायत ते यान अनेकवेळा खराब झाले आहे. बोईंगचा स्टारलाइनर प्रोग्राम अनेक वर्षांपासून सॉफ्टवेअरमधील त्रुटी, डिझाइन समस्या आणि उपकंत्राटदारांसोबतच्या वादांत अडकला आहे. 6 जून रोजी जेव्हा स्टारलाइनर स्पेस स्टेशनला डॉक करण्यासाठी पोहोचले तेव्हा थ्रस्टर फेल्युअर दिसून आले. यामुळे बिघाड दूर होईपर्यंत अंतराळयान अंतराळ स्थानकाजवळ गेले नाही.
पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर, अंतराळ यान 28,000 किमी/तास वेग कमी करण्यास सुरवात करेल. पुन्हा प्रवेश केल्यानंतर पॅराशूट यंत्रणेचे संरक्षण करण्यासाठी अंतराळ यानाची पुढील उष्णता ढाल काढली जाते. अंतराळ यानाचा वेग ताशी 6 किलोमीटर इतका असतो. पण हे सर्व खूपच आव्हानात्मक असते.
