माजी कसोटीपटू डेविड जॉनसनची आत्महत्या
अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन
बंगळुरू
डेविड जॉनसन या माजी कसोटी क्रिकेटपटूनं खासगी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं. भारताचा माजी क्रिकेटपटू डेविड जॉनसन यांचं वय 53 वर्ष होतं.डेविड जॉनसन यांनी 1996 मध्ये भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले होते. डेविड जॉनसन यांच्या निधनानं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. अनिल कुंबळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करुन माझा क्रिकेटमधील सहकारी डेविड जॉनसन याच्या निधनाची बातमी दु:खद असल्याचं म्हटलं. डेविड जॉनसन यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना अनिल कुंबळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
डेविड जॉनसन यांचं करिअर लवकर संपलं होतं. भारताकडून त्यांनी 10 ऑक्टोबर 1996 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिल्लीतील कसोटी मॅचमध्ये पदार्पण केलं होतं. डेविड जॉनसन यांनी भारतासाठी शेवटची कसोटी 26 डिसेंबर 1996 ला खेळली होती. त्यानंतर डेविड जॉनसन यांना संधी मिळाली नव्हती.अनिल कुंबळे प्रमाणं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी देखील डेविड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.भारतीय संघात डेविड जॉनसन यांना संधी मिळाली नव्हती. मात्र, देशांतर्गत क्रिकेट आणि लीग क्रिकेटमध्ये खेळत होते. डेविड जॉनसन यांच्या टोकाच्या पावलामुळं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. डेविड जॉनसन यांनी हे पाऊल का उचललं हे अद्याप समोर आलं नाही.
