प्रा. विक्रम पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान


सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, वर्ये येथील प्राध्यापक विक्रम दिनकर पाटील यांना शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स ॲंड मॅनेजमेंट विद्याशाखा अंतर्गत पीएचडी पदवी प्रदान झाली “ए स्टडी ऑफ क्रॉप इन्शुरन्स स्कीम्स विथ रेफरन्स टू सांगली डिस्ट्रिक्ट” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. व्ही बी कोडक यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. विक्रम पाटील यांचे संशोधन पर शोधनिबंध युजीसी सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोध पत्रिकेत प्रकाशित झाले असून अनेक परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग देखील नोंदविलेला आहे. ह्या संशोधनात त्यांनी पिक विमा योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी या योजना कशा उपयुक्त ठरतील यावर शोध प्रबंध सादर केला. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत दळवी व सचिव श्री विकास देशमुख इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. बी एस सावंत सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!