शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाणार?


सुनील तटकरे यांचा मोठा दावा
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा थेट लोकसभा निवडणुकीत रंगली असतानाच आता अजित पवार गटाने मोठा दावा केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.तटकरे यांनी पत्रकारांच्या अनौपचारिक चर्चेत हा मोठा दावा केल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.पक्षांतर्गत नाराजीतून पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत आमदार असल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे.
अनौपचारिक चर्चेत बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही भेट कोणत्याही क्षणी होऊ शकते, असेही बोलले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर राजकीय चर्चा रंगली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सोनिया दुहान, धीरज शर्मा आदी नाराजांचा गट सोनिया गांधींसोबत जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. मात्र, नेमके कोण आमदार जाणार हे तटकरे यांनी सांगितलं नाही. अंतर्गत नाराजीने पाच ते सहा आमदार दिल्लीमध्ये सातत्याने जातात, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभेच्या प्रचारात शरद पवार यांनी भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य केल्याने भूवया उंचावल्या होत्या. पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली होती, त्यांनी पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी कसे जवळीक साधतील किंवा पर्यायाचा विचार कसा करतील याबद्दल सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांच्यात वैचारिकदृष्ट्या समानता असल्याने त्यांना कोणताही फरक दिसत नसल्याचे पवार म्हणाले होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!