विविध राशींच्या स्वभावाचे मनोरंजक दर्शन


वसंत व्याख्यानमालेमध्ये विश्वास पटवर्धन यांचा कार्यक्रम
सातारा
सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच ज्योतिषाचे आकर्षण असते हे सर्वसामान्य नागरिक बारा राशींमध्ये विभागले गेले आहेत या सर्व राशींच्या स्वभावाचे वर्णन करणारा अनोखा मनोरंजक कार्यक्रम पुण्याचे विश्वास पटवर्धन यांनी येथील वसंत व्याख्यानमालेमध्ये सादर केला
स्वभाव राशींचे या शीर्षकाखालील या कार्यक्रमांमध्ये विश्वास पटवर्धन यांनी मनोरंजक पद्धतीने मेष ते मीन या बारा राशींच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन केले अनेक दाखले आणि अनेक किस्से सांगून त्यांनी श्रोत्यांना मनामुराद हसवले प्रत्येक माणूस आपल्या राशीप्रमाणेच वागतो आणि त्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याच्या राशीच्या स्वभावाचे दर्शन घडोघडी घडत असते याचे दाखले या निमित्ताने पटवर्धन यांनी दिले

Advertisement

 


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालेकर फुड्सचे नीलकंठ पालेकर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमाला उपक्रमाचे कौतुक केले ज्ञानविकास मंडळाचे प्रसाद चाफेकर यांनी सर्व उपस्थितांचा सत्कार केला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!