ज्ञानेश्वरी म्हणजे समुपदेशनाचे भांडार


वसंत व्याख्यानमालेमध्ये प्रा मनिषा रावराणे यांचे प्रतिपादन

सातारा
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणजे समुपदेशनाचे भांडार आहे सामान्य माणसाला जीवनामध्ये सतावणाऱ्या कोणत्याही समस्येवर तोडगा शोधून देण्याचे काम ज्ञानेश्वरी करू शकते असे प्रतिपादन प्रा मनिषा रावराणे यांनी केले
येथील ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये ज्ञानेश्वरी अमृतसागर या विषयावर व्याख्यान देताना प्रा रावराणे यांनी ज्ञानेश्वरीचा समग्र आढावा घेऊन त्यातील विचार आजही उपयुक्त कसे आहेत याचे दाखले दिले
मानसिक नियंत्रणाचे महत्त्वाचे काम ज्ञानेश्वरी करते असे सांगून रावराणे म्हणाल्या मानवी दुःखावर ममतेने फुंकर घालण्याची शक्ती ज्ञानेश्वरीतील विचारांमध्ये आहे आधुनिक भाषेत बोलायचे झाल्यास एक हिलर म्हणूनच ज्ञानेश्वरी काम करते ज्ञानेश्वरीतील समुपदेशनाची शक्ती अतुलनीय आहे

Advertisement

 


ज्ञानेश्वरीतील विविध तत्वांचा उल्लेख करताना रावराणे म्हणाल्या स्वधर्माचे पालन करा परधर्म आचरू नका असा उपदेश करताना संत ज्ञानेश्वरांनी आपले काम आपण करावे असा संदेश दिला आहे तसेच कोणतेही काम करताना संकोच करू नका असेही त्यांनी म्हटले आहे या व्यतिरिक्त गुरुचा गौरव करा गुरुचा आदर करा नम्रतापूर्वक व्यवहार करा असा सल्लाही ज्ञानेश्वरीमध्ये देण्यात आला आहे
वक्तृत्वगुण विकसित करण्यासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे ज्ञानेश्वरीमध्ये अफाट कवी कल्पना आहेत कवींसाठी सुद्धा ज्ञानेश्वरी हा एक आदर्श ग्रंथ आहे अत्यंत सोप्या पद्धतीने जीवनातील महत्त्वाचे विचार मांडण्याचे काम या ग्रंथात झाले आहे म्हणूनच हा ग्रंथ एक अमृतसागर ठरतो असे त्यांनी सांगितले
व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार आणि न्यूजमंडीचे संपादक मुकुंद फडके होते त्यांनीही ज्ञानेश्वरीतील कर्मफलाच्या सिद्धांताचा उल्लेख करून आधुनिक काळामध्ये ज्ञानेश्वरी एखाद्या रेडीरेकनर सारखे काम करत असल्याचे स्पष्ट केले
व्यासपीठावर वासुदेव दोशी उपस्थित होते
ज्ञानविकास मंडळाचे प्रसाद चाफेकर यांनी सर्वांचा सत्कार केला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!