पुण्यात पोर्शे कारने दोघांना चिरडले
अल्पवयीन चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा बळी
पुणे
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे गाडीने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे. मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या तरुणाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जणांचा जीव घेतला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिब रमजान मुल्ला याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कारचालक 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर जवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवून अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली.या अपघातात अनिस अवधिया व मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला.
मध्यरात्री घटलेला हा प्रकार पाहून कल्याणी नगर परिसरातील अनेक आजूबाजुला असलेले नागरिक गोळा झाले आणि सतरा वर्षीय भरधाव कारचालक असलेल्या मुलाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. कारचालक पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र त्याला नागरिकांनी भररस्त्यात अडवून धरलं आणि रस्त्यातच त्याला मारायला सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सतरा वर्षीय मुलगा पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अजून अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही
