अल्पवयीन मुलीने केली बहिणींची हत्या


१३ वर्षीय मुलीने लहान बहिणींचे दाबले गळे

Advertisement

लखनौ
उत्तर प्रदेशमध्ये एका 13 वर्षीय मुलीने आपल्या दोन बहिणींची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मृत बहिणींचं वय 7 आणि 5 वर्षे होते एसपी नीरज कुमार जदौन यांनी दिलेल्या माहितीनुसार नूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गौहावर जैत गावात दोन मुलींची हत्या झाल्याची माहिती मिळाली.पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना तेथील एका घरात सहदेव आणि सविता यांच्या सात आणि पाच वर्षांच्या दोन मुलींचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना कोणीही जबरदस्तीने घरात घुसल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेव आणि सविता त्यांच्या 5 मुलांसह या घरात राहत होते. सविताने दोनदा लग्न केलं आहे. तिचं पहिलं लग्न पुखराज नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. सविताची मोठी मुलगी (13) आणि तिची धाकटी मुलगी (9) या पुखराजच्या मुली आहेत. ज्या दोन मुलींची हत्या करण्यात आली त्या सविताचा दुसरा पती सहदेव यांच्या मुली होत्या. याशिवाय सविता आणि सहदेव यांना दीड वर्षांचा मुलगाही आहे. पोलिसांनी 13 वर्षांच्या मोठ्या मुलीची चौकशी केली.
पोलीस चौकशीत सुरुवातीला मोठ्या मुलीने सांगितलं की, दोन अनोळखी लोक घरात आले आणि त्यांनी दोन्ही बहिणींचा गळा दाबून खून केला. मात्र, नंतर तिने दोन्ही बहिणींची हत्या केल्याचं कबूल केलं. एसपी नीरज कुमार जदौन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या मुलीने सांगितलं की, वडील मोठं कुटुंब असल्याने चिंतेत होते, म्हणून तिने दोन्ही बहिणींची दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. दोन्ही मुलींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!