17 वर्षीय मुलगा बनला बाप
34 वर्षाची महिला बनली आजी
सिंगापूर
आजकालच्या तरुणाईला खूप लवकर प्रेम होतं. आता नुकत्याच समोर आलेल्या घटनेनं मात्र सर्वांनाच धक्का बसला आहे या घटनेत सिंगापूरमधील एक 17 वर्षाच्या मुलगा बाप बनला तर एक महिला 34 व्या वर्षी आजी बनली.
या महिलेने स्वतः तीन लग्न केले असून तिला पाच मुले आहेत. आता तिचा 17 वर्षांचा मुलगाही बाप बनलाय. त्यांनी नव्या पाहुण्याचं कुटुंबात स्वागत केलं. अवघ्या 17 वर्षाचा मुलगा बाप बनला ही गोष्ट लोकांना चकित करत आहे.या 34 वर्षीय महिलेचं नाव शर्ली लिंग आहे. महिलेनं सांगितलं की, माझं खूप कमी वयात लग्न झालं होतं. त्यानंतर मुलंही लवकर झाली. त्यामुळे मला वाटत होतं की माझ्या मुलांनी लग्न लवकर करु नये. त्यांनी त्यांचं आयुष्य छान जगावं. मात्र आपण मुलांना ज्या गोष्टींसाठी नको बोलतो त्यांच्याकडून त्याच घडतात. माझाय 17 वर्षांचा मुलगा बाप झाला. त्याची प्रेमिका गर्भवती राहिली तेव्हा मीच सल्ला दिला की आई-वडिल बनला. कारण अशा वेळी त्यांना रागवून आणि मारुन काही फायदा नसतो. त्यामुळे त्यांना सामंजस्यानं सांगणं गरजेचं असतं.शर्लीचं चिकन शॉप आहे. ती सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिची ही स्टोरी इंटरनेवर खूप चर्चेत असून लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
