शिवसागर जलाशयात बोट उलटली


पुलाचा सर्व्हे करताना दुर्घटना

Advertisement

सातारा :
कोयना धरणातील शिवसागर जलाशयात स्पीड बोट पलटी झाली.यामध्ये तीन प्रवासी होते. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आलं. मात्र, एकजण बुडाला आहे. स्थानिकांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
कोयना धरणातील शिवसागर जलाशयाच्या नदीपात्रात जोरदार वादळी वारे सुटल्यामुळं तापोळ्याकडून बामणोलीकडे येत असलेली स्पीड बोट तेटली गावानजीकच्या नदीपात्रात पलटी होऊन बुडाली. यामध्ये एकूण तीन जण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून एकजण बोटीसह बुडाला आहे. तर दोघेजण पोहून बाहेर निघाले. सदरची बोट ही पुलांचा सर्व्हे करणाऱ्या लोकांची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर पुलाच्या कामावरील कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!