पुण्यात १९ एप्रिलपासून बाल चित्रपट महोत्सव
श्यामची आई आणि अनेक चित्रपट दाखवणार

Advertisement

पुणे
शहरात दि. १९ ते २५ एप्रिल या कालावधीत बाल चित्रपट महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे यंदा २५ वे वर्ष आहे. सिटी प्राइड कोथरूड येथे सकाळी दहा वाजता चित्रपट दाखवले जाणार आहेत.
या महोत्सवात श्यामची आई, वेल डन बॉइज, ताजमाल, म्होरक्या, जिप्सी, उबुंटू आणि छबिला हे गाजलेले बाल चित्रपट दाखवले जातील. या महोत्सवाचे उद्घाटन दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिटी प्राइड कोथरूड येथे “श्यामची आई’ चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका साकारणारा बालकलाकार शर्व गाडगीळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, कोहिनूर ग्रुपचे कृष्कुमार गोयल, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर आणि सिटी प्राइड कोथरूडचे अरविंद चाफळकर यांच्या हस्ते होईल.
“श्यामची आई’चा नवा अविष्कार असलेल्या “श्यामची आई’ चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ होत आहे. यंदाच्याच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाणकारांची भरपूर प्रशंसा मिळविलेल्या अनिल भालेराव दिग्दर्शित ‘छबिला’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. यावेळी ज्येष्ठ अभिनेते बनलेले महेश कोठारे उपस्थित राहणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!