एकनाथ खडसे यांना धमकी


दाऊद आणि छोटा शकील गँगकडून चार वेळा फोन
मुंबई
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून त्यांना धमकीचे फोन आले आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एकनाथ खडसे यांना दाऊद, छोटा शकील गँगकडून ही धमकी देण्यात आली आहे. मुक्ताईनगर पोलिसांत एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. विविध देशातून धमकीचे फोन येत असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आला.
धमकी देणाऱ्याने छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार असल्याचं सांगितलं. तसंच तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. हे लोक तुम्हाला मारणार आहेत असं पुन्हा कॉल करून धमकी देणाऱ्याने सांगितलं. फोनचे लोकेशन अमेरिका, उत्तर प्रदेशातील लखनऊमधले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप धमकी देण्यामागचं कारण स्पष्ट झालेले नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!