गरिबीमुळे पत्नी आणि सात मुलांची कुऱ्हाडीने हत्या


पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात धक्कादायक घटना
इस्लामाबाद
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात धक्कादायक घटना घडली असून सज्जाद खोखर या इसमाने गरिबीला कंटाळून आपल्या पत्नीसह ७ लहान मुलांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने या गुन्ह्याची कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये आता सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशा आली आहे.आर्थिक अडचण आणि कुटुंबातील सदस्यांना अपुऱ्या पडणाऱ्या अन्नामुळे आरोपीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमध्ये औषध आणि अन्न यासारख्या मूलभूत गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.ही घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे. आरोपी सज्जाद खोखर याने आपल्या पत्नीसह ७ अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी हा आर्थिक अडचणींमुळे खूप अस्वस्थ होता. यामुळे त्याचे पत्नीसोबत भांडणही होत असे.
मृतांमध्ये खोखर यांची ४२ वर्षीय पत्नी कौसर, चार मुली आणि तीन मुलांचा समावेश आहे. खोखरने कुऱ्हाडीने वार करून सर्वांची हत्या केली आहे.मुलांना खायला अन्न देऊ शकत नाही म्हणून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!