बीबीए,बीसीएसाठी आता सीईटी
१०० गुणांची ऑनलाईन प्रवेश परीक्षा ,२७ मे ते २९ मे २०२४ या कालावधीत ऑनलाईन
सातारा
यूजीसी आणि एआयसीटीई यांच्या निर्देशानुसार नवीन फळ ळळीशैक्षणिक वर्ष २४- २५ पासून बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाला व्यवसायिक पदवी दर्जा मिळाल्यामुळे इंजिनिअरींग पदवी प्रवेशाप्रमाणे बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सीईटी प्रवेश परीक्षा सक्तीची केली आहे. सदर ऑनलाईन प्रवेश परीक्षा दि. २७ मे ते २९मे २०२४ या कालावधीत होणार आहे.
बारावी उत्तीर्णानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या बीबीए/बीसीए सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रथमच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरील परीक्षा केंद्रावर ही परिक्षा घेण्यात येणार असून बहुपर्यायी १०० गुणांची इंग्लिश भाषा, रिजनिंग, जनरल नाॅलेज, अवेअरनेस आणि काॅंम्प्यूटर बेसीक या अभ्यासक्रमावर असणार आहे. गुणांची सीईटी परीक्षेसाठी बारावीची परीक्षा दिलेल्या किंवा बारावी पास झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज नोंदणी www.mahacet.org अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती दि.११ एप्रिल २०२४ पर्यंत करणे आवश्यक आहे.
सदर ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एक हजार तर राखीव प्रवर्गासाठी आठशे रुपये शुल्क ऑनलाईन फार्म भरताना ऑनलाईन इंटरनेट पेमेंट, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बॅंकींग द्वारे भरावे लागणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी प्रवेश परीक्षा सीईटी २०२४ साठी आपली ऑनलाईन नोंदणी www.mahacet.org या संकेतस्थळावर दि. ११ एप्रिल पुर्वी करावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी.एस.सावंत यांनी केले आहे.
