केजरीवाल यांना 7 दिवसांची ईडी कोठडी


नवी दिल्ली
कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना कोर्टाने 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना रात्रभर ईडीच्या कार्यालयात राहावं लागलं. त्यानंतर त्यांना आज दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात दोन्ही बाजूने प्रचंड युक्तिवात करण्यात आला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. ईडीच्या युक्तिवादात अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्या 10 दिवस कोठडीची मागणी करण्यात आली. पण अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी ती मागणी फेटाळण्याची विनंती कोर्टापुढे केली.
कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडी कोठडीबाबतचा निकाल काही काळासाठी राखून ठेवला होता त्यानंतर आता कोर्टाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. हा दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षासाठी मोठा झटका आहे. आता अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात का ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!